
संतापजनक! तरुणीवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार
रात्री उशिरा चित्रपट पाहून घरी परतणाऱ्या मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार (Vellore Woman Physical Abused) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तमिळनाडूतील वेल्लोर (Vellore Tamil Nadu) येथील काटपाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे. पाच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत.
हेही वाचा: धक्कादायक! देशी दारू पाजवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पीडित मुलगी ही रुग्णालयात काम करते. ती शुक्रवारी तिच्या मित्रासोबत चित्रपट पाहायला गेली होती. त्यानंतर रुग्णालयात काम असल्यामुळे दोघेही मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ऑटोरिक्षातून रुग्णालयात जायला निघाले. त्यानंतर दोघेही घरी जाणार होते. त्यांच्यामागे दुसऱ्या ऑटोत पाच तरुण होते. त्यांनी यांच्या ऑटोला गाठून या जोडप्याला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर यांना निर्जन स्थळी नेऊन चाकूच्या धाकावर मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच तिच्या मित्राला देखील मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे मोबाईल, ४० हजार रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन आरोपींनी पळ काढला. त्यानंतर पीडित तरुणीने वेल्लोर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
तरुणीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशेष टीमच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेतला. पाच आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यापैकी दोन जण अल्पवयीन असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस फरार असलेल्या पाचव्या आरोपीचा शोध घेत आहेत, असे वेल्लोरचे पोलिस अधीक्षक एस. रमेश कन्नन यांनी सांगितले.
Web Title: Woman Physical Abused By Five People In Vellore Of Tamil Nadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..