11 year old raped in Greater Noida, doctors say she is critical 
देश

११ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; परिस्थिती गंभीर

सकाळ डिजिटल टीम

ग्रेटर नोएडा : ११ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा भागात घडली आहे. (Rape in Noida) मुलीला रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीसोबत सामूहिक अत्याचार (Gangrape) झाला असून तिची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तिच्या खासगी अवयवांवर अनेक जखमा आणि खुणा आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून २१ वर्षिय आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर मुलीला सेक्टर 30मध्ये जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रीतम पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईकोटेक-3 पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांत राहणाऱ्या ११ वर्षाची मुलगी शौचालयासाठी शेतात गेली असाताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जेव्हा मुलगी झालेल्या घटनेनंतर घरी पोहोचली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली.

शरीरावर अनेक ठिकाणी इजा
पिडित मुलीला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून मुलीची परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीच्या अंगावर असलेल्या जखमा पाहून तिला उपचारासाठी पुढील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तिच्या खासगी अवयवांवर मोठ्या प्रमाणात जखमा करण्यात आल्या आहेत.

गंभीर परिस्थितीत पोहचली घरी
सहायक पोलिस निरिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पुढील तपास करत असून बुधवारी रात्री उशिरा एकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव राकेश असल्याचे पोलिसांनी प्राथमिक माहितीत सांगितले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी जेव्हा शेतातून घरी परतली तेव्हा मोठ्या प्रमाणावर तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. तिची परिस्थिती पाहून आम्ही खूप घाबरलो होतो, त्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT