11 years of nirbhaya case swati maliwal shows disappointment marathi news delhi crime Esakal
देश

Delhi Crime : राजधानीतील ‘निर्भया प्रकरणाला ११ वर्ष पूर्ण, दशकात काहीच बदल झाला नाही; स्वाती मालीवाल

एका २३ वर्षीय युवतीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीतील एका बसमध्ये सहा आरोपींनी बलात्कार केला आणि तिला मारहाण केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाला हादरून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार घटनेला ११ वर्ष पूर्ण झालेले असताना गेल्या दशकात देशातल्या, राजधानीतील स्थितीत काहीच बदल झालेला नाही, अशी खंत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केली. दिल्लीत महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचेही त्या म्हणाल्या.

एका २३ वर्षीय युवतीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीतील एका बसमध्ये सहा आरोपींनी बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिला बसमधून फेकून देण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना २९ डिसेंबर रोजी सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात मृत्यू झाला.

या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आणि यानंतर लैंगिक शोषण आणि अत्याचारासंबंधी नवीन कायदे तयार करण्यात आले. या घटनेतील पीडितेला ‘निर्भया’ असे नाव देण्यात आले. यासंदर्भात स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘‘ निर्भयावर २०१२ मध्ये सामूहिक बलात्कार झाला.

या घटनेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि बदलाची मागणी करू लागले. मात्र आजही अनेक वर्षांनंतर आपण आहे तेथेच आहोत. महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जोपर्यंत गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार नाही आणि आपल्याला व्यवस्था मोकाट सोडणार नाही, असे जोपर्यंत आरोपींच्या मनाला वाटणार नाही, तोपर्यंत काही बदलणार नाही.

अशा प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा सुनावणे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन मालीवाल यांनी केले. अशा घटनांना चाप बसविण्यासाठी पोलिसांचे अधिकार आणि न्यायालयाची संख्या वाढवायला हवी. पीडितांना आणि कुटुंबीयांना वेगाने न्याय देणारी व्यवस्था तयार करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

निर्भया प्रकरण

निर्भयाप्रकरणी सहा आरोपींपैकी राम सिंह याने खटला सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोठडीत आत्महत्या केली. एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविले आणि तीन वर्षांनी २०१५ रोजी त्याची सुटका झाली. अन्य चार आरोपी मुकेश सिंह (वय ३२), पवन गुप्ता (वय २५), विनय शर्मा (वय २६), अक्षयकुमार सिंह (वय ३१) यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना २० मार्च २०२० मध्ये तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली.

मुलांच्या मनात महिलांविषयी आदर निर्माण करणाऱ्या विषयांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला हवा.कौटुंबीक हिंसाचार म्हणजे काय? त्याला कसे रोखता येईल? याचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. या गोष्टी शाळेतच शिकवल्या पाहिजेत. शाळेत शिकले नाही तर एखाद्या पुरुषाने महिलेवर हात उगारणे किती चुकीचे आहे, हे कोण सांगणार?

- स्वाति मालीवाल, अध्यक्षा दिल्ली महिला आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs SA: अ‍ॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला

Latest Marathi News Live Update : गोराई बस डेपोमध्ये दोन विशाल अजगर सापडल्याने खळबळ

Mahayuti Leaders Meeting Mumbai : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, गोकुळवर मुंबईत खलबते; महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत ठरलं! सतेज पाटील एकाकी पडणार

Donkey Breeding Scheme: आता गाढव ठरणार ‘सोन्याची खाण’! केंद्र सरकार देणार तब्बल ५० लाखांची मदत; काय आहे योजना?

Stock Market Today: 4 सत्रांच्या घसरणीला ब्रेक! शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT