12 crore jobs lost in lockdown says Sonia Gandhi to PM Modi 
देश

Coronavirus : लॉकडाऊनमुळे १२ कोटी नोकऱ्या जाणार : सोनिया गांधी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या काळात जवळपास १२ कोटी नोकऱ्या जाणार असल्याची भिती काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जवळपास अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे लोकांसमोर पोट कसं भरायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. अशा कुटुंबियांना केंद्र सरकारनं ७ हजार ५०० कोटी रुपयांची मदत द्यावी अशी मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, 'केंद्र सरकारनं अधिक गांभीर्यानं सर्व गोष्टी घेणं आवश्यक आहे. केवळ कामगारच नाही तर अनेक शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. आमच्याकडून आम्ही केंद्र सरकारसाठी अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामध्ये टेस्टिंग किट आणि टेस्टिंग क्षमता वाढवण्यात यावी. रँडम टेस्टिंग व्हावं. असे काही बदल सूचवण्यात आले होते. मात्र अद्यापही या केंद्र सरकारकडून या गोष्टींची कमतरता भासत आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत (ता. २२) कोरोनाबाधितांची संख्या २० हजार ४७१ एवढी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT