Chhattisgarh Bus Accident esakal
देश

Chhattisgarh Bus Accident : दुर्ग जिल्ह्यात 50 फूट खोल खाणीत बस कोसळून 12 जण ठार; 38 प्रवासी जखमी

छत्तीसगडमध्ये बसचा भीषण अपघात (Chhattisgarh Bus Accident) झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

दुर्ग (छत्तीसगड) : छत्तीसगडमध्ये बसचा भीषण अपघात (Chhattisgarh Bus Accident) झाला आहे. येथील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी बस खाणीत पडून 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अधिका-यांनी सांगितलं की, कुम्हारी पोलीस स्टेशन (Kumhari Police Station) हद्दीतील खापरी गावाजवळ असणाऱ्या मुरुमाच्या 50 फूट खोल खाणीत बस पडल्याने गाडीतून प्रवास करणाऱ्या बारा जणांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं असून बस खाणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT