देश

चालू आर्थिक वर्षात दूरसंचार क्षेत्रामध्ये १.२६ लाख तरुणांना रोजगार मिळणार, अहमदाबाद येथे प्रशिक्षण केंद्र

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षामध्ये दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात १.२६ लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती टेलिकॉम सेक्टर मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिलने (TSSC) अहमदाबाद येथील स्किल युनिव्हर्सिटी येथे नोकियाच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नवीन सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली आहे.

टीएसएससी या आर्थिक वर्षात १.२६ लाख तरुणांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळेल, असं विधान टीएसएससीचे सीईओ अरविंद बाली यांनी केलं आहे. नोकियासह नवीन केंद्राच्या लाँचिंग कार्यक्रमावेळी त्यांनी हे सांगितलं.

आयटीआय कुबेरनगर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे 5G तंत्रज्ञान आणि कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र स्थापन करीत आहे. त्याद्वारे ७० टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांमध्ये प्लेसमेंट ऑफर मिळेल. प्रकल्पाच्या पहिल्या वर्षामध्ये ३०० उमेदवारांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.

नोकिया इंडियाचे उच्चपदस्थ अधिकारी अमित मारवाह यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देणारा हा उपक्रम आहे. दूरसंचार तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करणारी नोकिया आघाडीवर आहे. आम्ही. 5G इकोसिस्टम तयार करण्यासाठी आम्ही मनुष्यबळ विकसित करीत आहोत.

नोकियाने सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून CoE साठी पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी गुंतवणूक केली आहे. गुजरातचे कामगार, कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री बलवंतसिंह राजपूत यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT