13 Pakistani Hindu refugees in Gujarat's Morbi become first to get Indian citizenship under CAA  Esakal
देश

CAA: गुजरातला स्थलांतरीत झालेल्या १३ पाकिस्तानी हिंदूंना CAA कायद्याने मिळालं भारतीय नागरिकत्व!

CAA: देशात 11 मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाल्यानंतर प्रथमच, मोरबीमधील 13 पाकिस्तानी हिंदू निर्वासितांना गुरुवारी भारतीय नागरिकत्व देण्यात आले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशात 11 मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाल्यानंतर प्रथमच, मोरबीमधील 13 पाकिस्तानी हिंदू निर्वासितांना गुरुवारी भारतीय नागरिकत्व देण्यात आले.(13 Pakistani Hindu refugees in Gujarat's Morbi become first to get Indian citizenship under CAA)

देशात CAA कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, जे इतर देशातून भारतात आले आहेत आणि भारतात आश्रय घेतला आहे त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जात आहे. याअंतर्गत काल (गुरूवारी) मोरबीमध्ये आणखी १३ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

जिल्हाधिकारी किरण झवेरी, आमदार कांतिभाई अमृतिया आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी खाचर यांनी थरपाकर (पाकिस्तान) येथील 13 नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल केले. ज्यामध्ये अवलकोर नेतसिंग, महावीर सिंग सोढा, समकोर नेतसिंग, नरसिंग भेरो, सरदारसिंग भेरो, नानो खेंगो, चेनो खेंगो, हरबाई वेंजो, तरण वेंजो, कोरो वेंजो, राजू वेंजो, अमरताबाई खेंगो आणि महाकोर खेंगो यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले.

अनेक कुटुंबे पाकिस्तानातून विविध कारणांमुळे स्थलांतरित होऊन भारतातील विविध प्रांतात स्थायिक झाली आहेत, त्यापैकी एक म्हणजे मोरबी. पाकिस्तानातील अनेक कुटुंबे मोरबीमध्ये मिसळली आहेत. या लोकांना नागरिकत्व देण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी के. बी. जवेरी म्हणाले की, अनेक कुटुंबे पाकिस्तानातून आलेली आहेत आणि मोरबीमध्ये राहत आहेत, तर 13 लोकांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशा स्थलांतरित व्यक्तींच्या नागरिकत्व अर्जांच्या मंजुरीसाठी जिल्हा प्रशासन वेगाने काम करत आहे. अशा नागरिकत्वाच्या अर्जांना पुरेशी पडताळणी आणि योग्य प्रक्रियेनंतर नागरिकत्व दिले जात आहे.

जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करताना आमदार कांतिभाई अमृतिया म्हणाले की, अतिशय वेगाने काम करून स्थलांतरित झालेल्या लोकांना नागरिकत्व देण्यात येत आहे. आज 13 लोक भारताचे कायमचे नागरिक बनले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT