13 thousand schools association wrote letter to pm narendra modi accusing bommai government of corruption  sakal
देश

१३ हजार शाळांच्या संस्थेकडून बोम्मई यांच्या भ्रष्टाचाराची मोंदीकडे तक्रार; पाठवले पत्र

सकाळ डिजिटल टीम

बंगलोर : कर्नाटकातील किमान 13,000 शाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन संघटनांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील बसवराज बोम्मई यांच्या भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. असोशीएटेड मॅनेजमेंट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल आणि द रजिस्टर्ड अनएडेड स्कूल मॅनेजमेंट असोशिएशनने पीएम मोदींना शैक्षणिक संस्थांना मान्यता प्रमाणपत्रे देण्यासाठी राज्य शिक्षण विभागाकडून मागितल्या जात असलेल्या कथित लाचांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

संघटनांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही तर्काशिवाय, भेदभावपूर्ण आणि विनाकरण असलेले नियम आणि मापदंड केवळ विनाअनुदानित खाजगी शाळांना लागू केले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. राज्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्याकडे अनेक तक्रारी केल्याचा दावा संघटनांनी केला आहे. पण तक्रारी आणि युक्तिवाद ऐकून घेतले नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपच्या दोन मंत्र्यांनी शुल्कात वाढ करून शिक्षणाचे व्यापारीकरण करणाऱ्या तसेच पालकांकडून अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळांऐवजी बजेट शाळांचे बरेच नुकसान केले असल्याचे म्हटले आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही सरकारने ठरवून दिलेली पाठ्यपुस्तके अद्याप शाळांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. शिक्षणमंत्र्यांना कठोर नियम आणि फ्रेम नियमांचे उदारीकरण करण्याबाबत काळजी वाटत नाही, जे पालक आणि विद्यार्थ्यांवर ओझे न टाकता सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही शाळांमध्ये व्यावहारिक आणि भौतिकरित्या लागू केले जाऊ शकतात असे देखील या संघटनांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT