Indo China
Indo China 
देश

Indo-China Border | भारत-चीन सैन्यात चर्चेची १३ वी फेरी सुरू

ओमकार वाबळे

गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन दरम्यानचे संबंध आणखी ताणले गेले. यानंतर मागील दोन महिन्यांपासून चीनने पुन्हा सीमेवर कारवाया करायला सुरुवात केल्याने सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे. यासाठी भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या 13 व्या फेरीला सुरुवात झाली आहे.

कॉर्प्स कमांडर पातळीवर पार पडणारी ही फेरी मोल्डो येथे चीनच्या बाजूने सुरू आहे. हॉट स्प्रिंग्स भआगातील पॅट्रोलिंग पॉईंट (पीपी) 15 पासून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेतील तिसरा टप्पा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचसोबत एकूणच डी-एस्केलेशनचा भाग म्हणून पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मोल्डो येथे सकाळी 10.30 च्या सुमारास ही चर्चा सुरू झाली, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली. भारतीय बाजूचे सैन्याच्या लेह स्थित 14 कोर कमांडर लेफ्टनंट जनरल पी.जी.के. मेनन हे नेतृत्व करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT