14 children got burnt electrocuted during a procession on the occasion of Mahashivratri in Kota marathi news  
देश

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत मोठा अपघात! १४ मुलांना वीजेचा धक्का

Mahashivratri 2024 Latest News : राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

राजस्थानमधील कोटा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका मिरवणुकीदरम्यान अनेक मुलांना विजेचा धक्का बसला. या मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवारी हा प्रकार मोर आला. कुन्हाडी थर्मल चौकाजवळून जाणाऱ्या महाशिवरात्री निमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत करंट पसरून १२ पेक्षा अधिक मुलांना धक्का बसला. विजेचा धक्का लागून १४ मुलांना एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक मुलांच्या हात-पायाला इजा झाली असून सर्वांवर तात्काळ उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला देखील रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी मुलांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर सर्व मुलांचे आरोग्य व्यवस्थीत राहावे यासाठी डॉक्टरांची टीम कार्यरत असल्याचे सांगितले. तर एका मुलाची प्रकृती गंभीर असून खूप लहान मुले आहेत. बालकांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू नये, अशा सूचना रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास मुलांनाही रेफर करून उत्तम उपचार दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT