PM-SHRI 
देश

PM-SHRI : 14,500 शाळा होणार अपग्रेड; केंद्राकडून 'पीएमश्री' योजनेची घोषणा

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'या' योजनेची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आता देशातील शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार देशभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन होणार आहे. यासाठी 'पीएमश्री' ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. (14500 schools to be upgraded from country under PM Shri scheme announced by PM Modi)

शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी आज काही घोषणा केल्या. म्हणाले, आज शिक्षण दिनानिमित्त मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेअंतर्गत भारतभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करण्यात येईल. यामुळं ही मॉडेल स्कूल होतील ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा (NEP) संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की PM-SHRI शाळांचा राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं (NEP) भारतातील लाखो विद्यार्थ्यांना आणखी फायदा होईल. PM-SHRI शाळांमध्ये शिक्षणाची आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण पद्धत असेल. तसेच शोध केंद्रीत शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल. अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि बरेच काही या नव्या योजनेंतर्गत येईल. तसेच शाळांमधील आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रीत केलं जाईल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT