Kanpur Accident Google file photo
देश

कानपूरमध्ये भीषण अपघात; १६ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

सध्या हॅलेट रुग्णालयामध्ये पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वृत्तसंस्था

सध्या हॅलेट रुग्णालयामध्ये पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील सचेंडी भागात लोडरला धडक दिल्याने बस पुलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे. तर २४ जण जखमी झाले असून काही जखमींना हॅलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सीएमओ स्वत: हॅलेट येथे पोहोचले. (15 killed and 24 injured as bus collides with loader near Kanpur)

मिळालेल्या माहितीनुसार, सचेंडीमधील किसननगर येथे भारत गॅस एजन्सीसमोर हा अपघात झाला. कानपूरहून बस इटावाकडे जात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले. मृतांमध्ये कल्याणपूर ब्लॉकमधील ईश्वरीगंज आणि लालपूर गावचे रहिवासी आहेत, अशी माहिती स्थानिक आमदार अभिजित सांगा यांनी दिली. अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तीव्र शोक व्यक्त केला असून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सध्या हॅलेट रुग्णालयामध्ये पाच जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून पाच जखमींवर उपचार सुरू आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासह मुख्यमंत्र्यांनी कानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुर्घटनेचा तपास अहवाल देण्यास सांगितले आहे.

आयजी मोहित अग्रवाल म्हणाले की, प्राथमिक चौकशीत असे आढळून आले आहे की, बसमध्ये प्रवास करणारे १२ लोक सचेंडी येथील बिस्किट कारखान्यात कामावर जात होते. समोरून येणाऱ्या लोडरने बसला धडक दिली. यामुळे बस उलटली.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT