देश

15 वर्षीय मुलीने प्रियकरासोबत मिळून केली वडिलांची हत्या, कारण...

वृत्तसंस्था

बंगळुरु : वडिलांनी प्रियकरासोबत असलेलं नातं स्वीकारण्यास नकार दिला. शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं. वडिलांनी मोबाइल काढून घेतला होता आणि इंटरनेच्या वापरावरही मर्यादा आणल्याने मुलीने आपल्या प्रियकरासोबत वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बंगळुरुमध्ये घडली आहे.

15 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे हत्येची कबुली देताना आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं यामुळेच वडिलांची हत्या केली असल्याचे सांगितलं आहे. आपण डेटवर गेल्याने वडिलांनी कशा पद्धतीने मारहाण केली आणि मोबाइल वापरण्याचं स्वातंत्र्य काढून घेतलं हेदेखील मुलीने सांगितलं आहे. मुलीच्या 19 वर्षीय प्रियकराने आणि मुलीन संगनमताने वडिलांची हत्या केली आहे.

मुलीला पोलिसांनी अटक केली असून मुलीने सांगितल्यानुसार, वडिलांना प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला पट्ट्याने मारहाण केली होती. शाळेत असतानाच मुलीचे प्रियकरासोबत संबंध होते. प्रियकर शाळा सोडून कॉलेजात गेल्यानंतरही त्यांच्यातील संबंध कायम होते. दोघेही अनेकदा मॉलमध्ये भेटायचे तसंच फोनवर बोलत असायचे. मुलीच्या वडिलांना हे कळल्यानंतर त्यांनी हे नातं संपवण्यास सांगितलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रियकराने मुलीला एक मोबाइल गिफ्ट केला होता. यावरुन ते नेहमी लपून संवाद साधत असत. पण जेव्हा मुलीला वडिलांकडून त्रास होऊ लागला तेव्हा ते अनेकदा याचा बदला घेतला पाहिजे अशी चर्चा करु लागले होते. नंतर दोघांनीही हत्येचा कट रचला. मुलीने वडिलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि प्रियकराला घरी बोलावून घेतलं. वडील बेशुद्द पडले आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी मुलगी सतत कानाखाली मारत होती. काही वेळाने दोघांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केली. दोघांनी हत्येची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT