15 year old boy commits suicide 15 year old boy commits suicide
देश

वडिलांनी हिसकावून घेतला मोबाईल; १५ वर्षाच्या मुलाने लावला गळफास

सकाळ डिजिटल टीम

वडिलांनी मुलाला मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केली. यामुळे चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात घरात गळफास लावून आत्महत्या (commits suicide) केली. प्रिन्स (वय १५) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुजरातमधील सुरत जिल्ह्यात घडली. मृत्यूनंतर आई-वडिलांनी प्रिन्सने डोळे दान केले आहेत. (15 year old boy commits suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश भाई (रा. शिलालेख सोसायटी, सुरत) हे पाणीपुरवठ्याचे काम करतात. त्यांचा १५ वर्षांचा मुलगा प्रिन्स बारडोलीच्या शाळेत शिकत असे. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. वसतिगृहात शिकणारा प्रिन्स सुट्टीत घरी आला होता. प्रिन्स नेहमी मोबाईलवर गेम खेळायचा. यामुळे वडील प्रिन्सला गेम खेळण्यास मनाई करायचे.

मात्र, प्रिन्स मोबाईलवर गेम खेळण्यासाठी जिद्द करायचा. यामुळे वडिलांनी प्रिन्सचा मोबाईल हिसकावून घेत फटकारले. यामुळे चिडलेल्या प्रिन्सने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या (commits suicide) केली. याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी प्रिन्सला तात्काळ सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याची सवय झाली होती. मनाई केल्यानंतरही तो गेग खेळण्यासाठी जिद्द करीत असायचा. यामुळे त्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता. यामुळे त्याने आत्महत्या (commits suicide) केली. आई-वडिलांनी प्रिन्सने डोळे दान केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT