Income Tax Notice
Income Tax Notice Sakal
देश

Income Tax Notice : भाजीवाल्याच्या खात्यात अचानक जमा झाले 172 कोटी रुपये; नोटीस आल्यावर प्रकरण उघडकीस

सकाळ डिजिटल टीम

Income Tax Notice : उत्तर प्रदेशात भाजी विकणाऱ्या एका व्यक्तीला अचानक आयकराची नोटीस आली. तुमच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांचा कर भरला नाही, असे लिहिले होते. हे पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भाजीपाला व्यापाऱ्याच्या खात्यात 172 कोटी रुपये आहेत. दुसरीकडे भाजी विक्रेत्याचे वेगळेच म्हणणे आहे. तो आता पोलिसांची मदत घेत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या. (172 crores in Bhajiwala’s account Income tax officials were also shocked after seeing the bank balance)

सुमारे महिनाभरापूर्वी आयटी टीमला पैशांच्या हस्तांतरणाची यादी मिळाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. आज तकच्या वृत्तानुसार, हे प्रकरण गाझीपूरमधील गहमर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे.

रायपट्टी परिसरात राहणारे विनोद रस्तोगी हे भाजीविक्रीचे काम करतात. एक दिवस अचानक त्यांना आयकराची नोटीस आली. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या खात्यात 172 कोटी 81 लाख 59 हजार रुपये जमा झाल्याचे समोर आले.

विनोद या प्रकरणावर सांगतात की, हे पैसे त्यांचे नाहीत. विनोद यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि सांगितले की कोणीतरी त्यांच्या आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर करून हे खाते उघडले. चेकद्वारे कोट्यवधी रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याची माहिती आहे.

विनोद पुढे म्हणाले की मला याची माहिती मिळाली जेव्हा इन्कम टॅक्सने मला या रकमेवर कर भरण्याची नोटीस पाठवली. माझ्या कागदपत्रांसह फसवणूक करून खाते उघडण्यात आले आहे.

हे खाते माझे नाही आणि या खात्यात माझे पैसे नाहीत. गहमर पोलीस स्टेशनने मला जिल्हा मुख्यालयाच्या सायबर सेलमध्ये जाण्यास सांगितले आहे.

गहमर कोतवालीचे प्रभारी निरीक्षक पवनकुमार उपाध्याय यांनी सांगितले की हे प्रकरण सायबर क्राईमचे आहे, त्यामुळे विनोदला सायबर सेलकडे पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ते कोणाचे खाते आहे हे कळेल.

विनोद आणि त्यांचे कुटुंब महिनाभरापासून पोलिस ठाणे, आयकर कार्यालय आणि विविध एजन्सीच्या फेऱ्या मारत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview: शरद पवार अन् मी म्हणजे संताजी-धनाजी..., मोदींची औरंगजेबाशी तुलना करत ठाकरेंची टोलेबाजी

Allu Arjun: आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

PM Modi: 'उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी...'; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update : "ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच," बावनकुळेंचा ठाकरे-राऊतांना टोला

SCROLL FOR NEXT