Assam Elephant Twitter file photo
देश

आसाममध्ये १८ हत्तींचा मृत्यू; वीज कोसळल्याने घडली दुर्घटना

वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जंगली हत्तींना जीव गमवावा लागला याबद्दल आसामचे वनमंत्री परिमल शुक्लवैद्य यांनी शोक व्यक्त केला आहे.

वृत्तसंस्था

दिसपूर : आसाममधील (Assam) नागाव-कार्बी आंगलोंग जिल्ह्याच्या सीमा भागातील जंगल परिसरात गुरुवारी (ता.१३) १८ हत्ती (Elephants) मृतावस्थेत आढळून आले. वीज कोसळल्याने (lightning) या हत्तींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. देशभरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत एकाचवेळी हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (18 Elephants killed in lightning strike at nagaon area in Assam)

कुंडटोली रेंजमधील कुंडोली प्रस्तावित राखील जंगलाजवळील डोंगराळ भागात बुधवारी (ता.१२) ही घटना घडली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १८ हत्तींचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती आसामचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

एका ठिकाणी ४ तर दुसऱ्या ठिकाणी १४ हत्तींचे मृतदेह सापडले. वीज कोसळल्याने या सर्व हत्तींचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. वनविभागातील उच्च अधिकारी आणि पशुवैद्यांना घटनास्थळी नेण्यात आले होते. नागाव जिल्ह्यातील मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) यांनाही घटनास्थळी पाठविण्यात आले होते. १८ जंगली हत्तींच्या मृत्यूच्या कारणाबाबत ते चौकशी करतील. पोस्टमॉर्टम अहवालातून मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा खुलासा होईल, असेही सहाय यांनी सांगितले.

वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ जंगली हत्तींना जीव गमवावा लागला याबद्दल आसामचे वनमंत्री परिमल शुक्लवैद्य यांनी शोक व्यक्त केला आहे. आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पीसीसीएफ (वन्यजीव) आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती मंत्री शुक्लवैद्य यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update: माजी आमदार दिलीप मोहिते भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

Donald Trump: इराणला शस्त्र देणाऱ्या देशांना ५०% टॅरिफ लागणार; युरेनियम संवर्धन करणार नाही, सीजफायरनंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अवैध मासेमारी करणाऱ्यांनो सावधान! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता ड्रोनची नजर राहणार; सरकारचा नवा प्लॅन लागू

SCROLL FOR NEXT