Accident News sakal
देश

Accident News : टँकर-आराम बसच्या धडकेत १८ जण ठार;उत्तर प्रदेशात दुर्घटना,१९ जखमी, दोन्ही चालकांचा मृत्यू

वातानुकूलित स्लिपर कोच बस आणि दुधाचा टँकर यांच्यात झालेल्या अपघातात १८ जण ठार तर १९ जण जखमी झाले. हा अपघात लखनौ-आग्रा महामार्गावर जोजिकोट गावाजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास घडला.

सकाळ वृत्तसेवा

उन्नाव (उत्तर प्रदेश) : वातानुकूलित स्लिपर कोच बस आणि दुधाचा टँकर यांच्यात झालेल्या अपघातात १८ जण ठार तर १९ जण जखमी झाले. हा अपघात लखनौ-आग्रा महामार्गावर जोजिकोट गावाजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास घडला. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली आहे.

हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात झाल्याचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले. तसेच बसमध्ये गरजेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे ते म्हणाले. मृतांत चौदा पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा समावेश होता. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल केले. घटनेच्या वेळी बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. या अपघातात जखमी झालेले मोहंमद शामिम म्हणाले, प्रवासादरम्यान झोपेत होतो आणि अपघात कसा झाला, हे मी सांगू शकत नाही. अनेक प्रवाशांच्या डोक्याला जोरात मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बिहारच्या शिवहर येथून दिल्लीकडे जाणारी महोबा जिल्ह्यातील ट्रॅव्हल कंपनीची स्लिपर बस पहाटे पाचच्या सुमारास बेहटा मुजावर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जोजिकोट गावाजवळ पोचली. त्याचवेळी लखनौहून आग्राकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाचा अंदाज चुकल्याने बसला जोरात धडक बसली. मात्र काहींच्या मते, बसने ओव्हरटेक केल्याने अपघात झाला. या धडकेमुळे टँकर वेगात उलटला. तसेच बसच्या चालकाकडील उजवा भाग कापला गेला आणि या बाजूला असलेल्या १८ जणांचा झोपेतच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले.

अपघातानंतर वाहतूक कोंडी

बस आणि टँकर रस्त्यावरच उलटल्याने आग्राकडे जाणारा मार्ग ठप्प झाला. दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली. उत्तर प्रदेश महामार्ग उद्योग विकास प्राधिकरणाच्या पथकाने दुभाजकासाठी असलेले कॉंक्रिट बोल्डर बाजूला काढले आणि एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू केली. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक विस्कळित झाली होती. मृतांची ओळख पटली असून यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून आरक्षित तिकिटाच्या आधारावर मृतांची ओळख पटविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT