18th Lok Sabha election 2024 BJP micro planning for 144 seats
18th Lok Sabha election 2024 BJP micro planning for 144 seats sakal
देश

२०२४ साठी भाजपाचे ‘मायक्रो प्लॅनिंग' सुरू, ‘त्या‘ १४४ जागांकडे लक्ष

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - आगामी १८ व्या लोकसभेसाठी मिशन २०२४ च्या तयारीला लागलेल्या भाजपने नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याच्या जोडीलाच विजयासाठी संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पक्षाने देशभरातील अशा १४४ जागांवर २०२४ मध्ये जोर लावण्याचे ठरविले आहे जेथे भाजप उमेदवार दुसऱया वा तिसऱया क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांना वाटून देण्यात आली असून मुंबईसह महाराष्ट्रातील अशा ८ मतदारसंघांची जबाबदारी सर्वश्री ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग ठाकूर, भूपेंंद्र यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यासह आमदार, स्थानिक भाजप कार्यकर्ते व संघ प्रचारकांशी समन्वय साधून या नेत्यांनी या मतदारसंघांत भाजपचा खुंटा बळकट करायचा आहे.

‘मिशन १४४‘ मध्ये या साऱया जागांची विभागणी ४० उपविभागांत करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या मतदारसंघांत वारंवार दौरे करायचे आहेत. यात सर्वाधिक १९ व १५ जागा पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशातून येतात. महाराष्ट्रातील ८ जागांचा यात समावेश आहे. याशिवाय राज्यातील शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांवरही विशएष फोकस ठेवण्याचे बाजपचे नियोजन आहे कारण सेनेचे खासदार २०१९ मध्येही मोदींच्याच नावावर लोकसभेत पोहोचल्याचा पक्षाचा दावा आहे. यात ओडिशातील १३ व तेलंगणातील १२ मतदारसंघांचा समावेश आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघाची जबाबदारी कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्यावर तर मुलायमसिंह यादव यांच्या मतदारसंघाची जबाबदारी पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यार टाकण्यात आली आहे. या १४४ जागांवर संबंधित मंत्र्यांनी प्रत्येकी किमान ३ दिवस मुक्काम करावा व मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसारही करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तेथील कमकुवत बूथ व विधानसभा मतदारसंघांचाही आढावा त्यांनी घ्यायचा आहे. देशभरातील ७४ हजार असे बूथ भाजपने हुडकून काढले आहेत जेथे पक्षाचे संघटन अत्यंत कमकुवत आहे. या बूथची जबाबदारी त्या त्या भागातील खासदार, आमदार, नगरसेवक व बूथप्रमुख यांच्यावर राहील.

सत्तरीपार खासदार वानप्रस्थाश्रमात !

सत्तरी पार केलेल्यांची तिकीटे २०२४ मध्ये कापायची हा संघप्रणित फॉर्म्यूला प्रत्यक्षात आणण्याचे भाजपने ठरविले तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदींचा अपवाद अपरिहार्य ठरणार आहे. यासाठी १९५६ च्या अगोदर जन्म झालेले खासदार असा निकष लावण्यात येऊ शकतो. २०२४ पर्यंत सध्याच्या ३०१ पैकी सुमारे २५ टक्के म्हणजे ८१ खासदार सरळसरळ बाद होत आहेत. त्यात राज्यातील रावसाहेब दानवे, गिरीश बापट,गोपाळ शेट्टी, सुभाष भामरे, जयसिध्देश्वर स्वामी व रामदास तडस आणि गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे जे २०२४ मध्ये सत्तीच्या जवळपास किंवा त्यापुढे जातील. यात हेमामालिनी, गिरीराजसिंह, रविशंकर प्रसाद व माजी लष्करप्रमुख व्ही के सिंह यांच्यासह १२ खासदार एकट्या उत्तर प्रदेशातून येतात. हेमामालिनी यांच्या मथुरेतून योगी आदित्यनाथ यांचे विश्वासू श्रीकांत शर्मा यांना पुन्हा दिल्लीत आणण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT