199 vintage gold coins stolen while demolishing house in gujarat navsari five arrested  
देश

घर पाडताना सापडलेल्या खजिन्यावर मजूरांचा डल्ला; सोन्याची 199 नाणी पळवली, पण...

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात बिलिमोरा येथे एक घर पाडण्याचे काम सुरू होते. यादरम्यान येथे काम करणाऱ्या मजूरांना मोठा खजिना सापडला आणि त्यांनी तो लंपास केल्याने खळबळ उडाली होती.

रोहित कणसे

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात बिलिमोरा येथे एक घर पाडण्याचे काम सुरू होते. यादरम्यान येथे काम करणाऱ्या मजूरांना मोठा खजिना सापडला आणि त्यांनी तो लंपास केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान या चोरीच्या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, सोमवारी १९९ ही सोन्याची नाणी चोरल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या नाण्यांवर किंग जॉर्ज पंचम याचा प्रतिमा आहे. तसेच ज्या बंगल्यात का खजिना सापडला आहे तो बजार स्ट्रीट वर असलेला एमआरआय हवाबेन बलिया यांचा आहे. सध्या हे एनआरआय यूनायटेड किंगडमच्या लेसेस्टर येथे राहतात.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बलियायांनी ठेकेदार सरफराज करादिया आणि मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील चार मजूरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नवसारी पोलीस अधिक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितलं की, एका जु्न्या घरात सोन्याचे नाणे चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहै. एकूण पाच लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. घरमालकाने २१ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केली होती.

एसपींनी सांगितलं की, आरोपींविरोधात कलम ४०६ आणि ११४ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहे, तसेच आरोपींनी घराचे पाडकाम करताना नाणी चोरल्याचे कबूल केले आहे. पोलीसांच्या पथकाने सहा वेळा अलीराजपूरचा दौरा केला आणि चर मजूरांना अटक करण्यात आलं. वलसाड येथील ठेकेदाराला देखील २६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली, त्याला तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पोलीसांनीही हात साफ केला?

पोलीसांनी सांगितलं की, आरोपींच्या घरातून किंग जॉर्ज पंचम याची प्रतिमा असलेले १९९ नाणे जप्त करण्यात आले आहेत, हे १९९२ चे आहेत. प्रत्येक नाण्याचं वजन ८ ग्रॅम आहे. तसेच बाजारात या नाण्याची किंमत ९२ लाख रुपये आहे. महत्वाचे म्हणजे कामगारांना अटक केल्यानंतर त्यांच्यापैकी एकाच्या तक्रारीनंतर अलीराजपूर येथील सोंडबा पोलीस स्टेशनमध्ये देखील एक एफआयरा दाखल करण्यात आला, ज्यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. मजूरांनी दावा केला होता की पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील काही सोन्याची नाणी लुटली.

दरम्यान एसपींनी सांगितलं की, नवसारी पोलीस आता या प्रकरणात पुढील कारवाईसाठी एमपी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी तसेच त्यांच्या ताब्यातील नाणी जप्त करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागीतली जाईल. जप्त केलेली नाणी सध्या कोर्टाकडे आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर ती राज्य सरकार किंवा याचिकाकर्त्याला सोपवली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT