Chenab Rail Bridge Esakal
देश

Chenab Rail Bridge: जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर धावली ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला यशस्वी चाचणीचा VIDEO

Chenab Rail Bridge: काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. लवकरच त्यावर रेल्वे धावताना दिसतील. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चिनाब रेल्वे पुलावरून ट्रेन जात असल्याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जम्मू-काश्मीरमध्ये बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावर लवकरच रेल्वे धावताना दिसणार आहेत. चिनाब नदीवर सुमारे 359 मीटर उंचीवर बांधलेला हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी रामबन जिल्ह्यातील सांगलदान आणि जम्मू-काश्मीरमधील रियासी दरम्यान नव्याने बांधलेल्या चिनाब रेल्वे पुलाची पाहणी केली.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती या यशस्वी चाचणीचा व्हिडीओ शेअर केला आहे. "पहिली ट्रायल ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे, यावेळी चिनाब पूल ओलांडला आहे. USBRL चे सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, फक्त बोगदा क्रमांक एक अंशतः अपूर्ण आहे."

यूएसबीआरएल प्रकल्प वर्षअखेरीस होईल पूर्ण

उधमपुरा श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

1486 कोटी रुपये खर्चून केले पुलाचे बांधकाम

चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात एकूण 30,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल 1486 कोटी रुपये खर्च करून नदीवरती बांधण्यात आला आहे. तो 260 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा सामना करू शकते. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे. ही ट्रेन 7 स्थानकांवरून बारामुल्लाला पोहोचेल. खोऱ्यातील लोकांना येण्याजाण्याची व्यवस्थित सुविधा मिळावी हा त्याचा उद्देश आहे.

हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच

जम्मू आणि काश्मीरमध्ये बनवलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीच्या सुमारे 359 मीटर उंचीवर बांधला गेला आहे आणि आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. जम्मू-काश्मीर प्रशासन हा पूल पर्यटकांचे आकर्षण म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

Baby Elephant Viral Video: चिखलात उड्या, मस्ती अन् मजा! हत्तींच्या पिल्लांचा मजेदार व्हिडिओ पाहून दिवस बनेल खास

Nashik Mahapalika Nivadnuk: नाशिक महापालिकेचा गड कोण जिंकणार? दोन ठाकरे, भाजप की शिंदे? भविष्यासाठी निर्णायक असलेली निवडणूक

SCROLL FOR NEXT