20 YouTube Channels Banned in india 
देश

सरकारची मोठी कारवाई, 20 'Anti India' यूट्यूब चॅनल्सवर घातली बंदी

सकाळ डिजिटल टीम

20 YouTube Channels Banned : भारत सरकारने सोमवारी देशविरोधी प्रचार करणाऱ्या 20 युट्यूब चॅनल्स ( YouTube Channels) वर बंदी घातली आहे. आयटी (IT Act 2021) कायद्यात नुकत्याच समावेश करण्यात आलेल्या गाइडलाइन्सच्या आधारे प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या युट्युब चॅनलसह 2 वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानंतर YouTube ने ही कारवाई केली असली तरी, या कारवाईबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

IT कायदा 2021अंतर्गत करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या कारवाईत 20 यूट्यूब चॅनेलशिवाय दोन वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली. दरम्यान काही रिपोर्टनुसार, ही सर्व 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सही पाकिस्तानमधून (Pakistan) चालवल्या जात होत्या.

सरकारी अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, हे चॅनेल आणि वेबसाइट्सवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या मदतीने भारतविरोधी प्रचार केला जात होता. अधिका-यांनी सांगितले की, या चॅनलमध्ये 'नया पाकिस्तान' नावाचे एक चॅनेल होते ज्याचे सुमारे 20 लाख सबस्क्रायबर्स होते. हे चॅनल्स कृषी कायद्यांच्या विरोधात आणि अयोध्येपासून काश्मीरपर्यंत खोट्या बातम्या (Fake News) पसरवत होते.

स्पेशल पावर्सचा वापर

आयटी कायद्यानुसार, आणीबाणीच्या काळात पहिल्यांदाच स्पेशल पावर्सचा वापर करत या चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या चॅनल्स पैकी 15 चॅनल हे 'नया पाकिस्तान' ग्रूपच्या मालकीचे आहेत. या चॅनेलवर पब्लिश झालेले काही व्हिडिओ कलम 370, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीर वर चालून येत असलेले तालिबानी फायटर्स या संबंधीत होते. या व्हिडिओंना 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT