LPG Cylinder Price Hike esakal
देश

LPG Booking Offers : LPG बुकिंगवर मिळतोय 20 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक

गेल्या काही दिवसांमध्ये LPG सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

LPG Booking Offers : गेल्या काही दिवसांमध्ये LPG सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

मात्र, आज आम्ही वाढत्या LPG च्या किमतीत जर तो बुक करताना 20 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे असे सांगितले तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. देशातील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे अॅपद्वारे गॅस बुक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आज बरेच लोक पेटीएम, फ्रीचार्ज, बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे एलपीजी बुक करतात. त्यात ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या ऑफरही वेळोवेळी देत असतात. त्यात आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्रीचार्ज आणि बजाज फिनसर्व्हने अॅप्सद्वारे बुकिंग करण्यावर जोरदार डिस्काउंट दिला आहे.

कसा मिळवाल डिस्काउंट

फ्रीचार्ज अॅपद्वारे पहिल्यांदाच एलपीजी बुक करणार असाल तर, तुम्हाला 20% कॅशबॅक म्हणजेच कमाल 200 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. हे अॅप तुम्हाला भारत गॅस (BPCL), एचपी गॅस आणि इंडेन या तिन्ही गॅस कंपन्यांच्या बुकिंवर देण्यात येत आहे.

कसे कराल बूक

फ्रीचार्ज वरून गॅस कसा बुक करताना तुम्हाला सर्वात पहिले हे अॅप ओपन करावे लागले. त्यानंतर गॅस प्रोव्हायडरचा पर्याय निवडून तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. ही सर्व माहिती भरू झाल्यानंतर पेमेंट करा. कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला GAS100 चा प्रोमोकोड तेथे टाकणे आवश्यक आहे. बुकिंगच्या 2 दिवसात कॅशबॅकचे पैसे तुमच्या खात्यात पुन्हा ट्रान्सफर केले जातील.

बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे मिळतोय 10 % पर्यंतचा कॅशबॅक

बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे गॅस सिलेंडर बुक केल्यावर तुम्हाला 10% किंवा जास्तीत जास्त 70 रुपये कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्हाला पेमेंटसाठी बजाज पे UPI द्वारे पेमेंट करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT