NEET Exam esakal
देश

NEET परीक्षेत नापास झालेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीची सातव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

NEET परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळं विद्यार्थिनीनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ डिजिटल टीम

NEET परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळं विद्यार्थिनीनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.

नोएडा : देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये (Noida) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. सेक्टर 151 येथील अमन सोसायटीमध्ये NEET परीक्षेत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीनं सातव्या मजल्यावरून उडी मारली. एवढ्या उंचीवरून पडून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

NEET परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळं विद्यार्थिनीनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. मुलीचे कुटुंब टॉवर 5 मध्ये राहते, तर मुलीनं 7 व्या टॉवरवरून उडी मारलीय. यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency NTA) बुधवारी (7 सप्टेंबर) देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, NEET परीक्षेला बसलेल्या 7,63,545 पैकी 4,29,160 मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर 10,01,015 पैकी 5,63,902 मुलींनी NEET-UG 2022 ची परीक्षा उत्तीर्ण केलीय. 17 जुलै रोजी पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा झाली. देशातील 497 शहरं आणि भारतातील 14 शहरांमध्ये झालेल्या 3,570 केंद्रांवर या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT