J-P-Nadda File photo
देश

सहा महिन्यात २०० कोटी डोस; नड्डांनी सांगितला भाजपचा रोडमॅप

सुरुवातीला केवळ २ कंपन्या लस बनवत होत्या. आज १३ कंपन्या भारतात लस बनवतात. डिसेंबरपर्यंत १९ कंपन्या भारतात लस बनवण्यास सुरवात करतील आणि भारतात २०० कोटी लस डोस उपलब्ध असतील.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी (ता.१०) कोरोना व्हायरसच्या साथीसंबंधी केंद्र सरकारच्या तयारीचे कौतुक केले. ''डिसेंबरपर्यंत १९ कंपन्या भारतात लस तयार करतील आणि देशात सुमारे २०० कोटी लस उपलब्ध असतील,'' असे नड्डा म्हणाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नड्डांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ()

नड्डा पुढे म्हणाले की, 'गेल्यावर्षी आपल्याकडे एक टेस्टिंग लॅब होती आणि चाचणी क्षमता १५०० होती. आज एका दिवसात देशात २५ लाख नमुन्यांची चाचणी घेतली जाते आणि आपल्याकडे २५०० प्रयोगशाळा आहेत. कोविडच्या संकटाला सामोरे जाण्याची भारत सरकारची तयारी कौतुकास्पद आहे आणि ती देशाची ताकद दाखवते.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही ऑक्सिजनचे उत्पादन ९०० मेट्रिक टनपासून ९४४६ मेट्रिक टनपर्यंत वाढविले. ९ महिन्यांतच भारतात दोन लस उपलब्ध झाल्या. आपल्या देशाच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व कामगिरी होती. सुरुवातीला केवळ २ कंपन्या लस बनवत होत्या. आज १३ कंपन्या भारतात लस बनवतात. डिसेंबरपर्यंत १९ कंपन्या भारतात लस बनवण्यास सुरवात करतील आणि भारतात २०० कोटी लस डोस उपलब्ध असतील,' असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

अरुणाचल प्रदेशमधील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नड्डा म्हणाले की, गेली दोन दशके भाजप एक खोली असलेल्या कार्यालयातून कामकाज चालवत होती. आता भाजप कार्यालयाची एक स्वतंत्र इमारत तयार करण्यात आली आहे. हे कार्यालय ४७२ चौकिमी जागेत बांधले गेले असून यात सहा मजले आणि ३३ खोल्या आहेत. येथे कॅन्टीन, कॉन्फरन्स रूम, आयटी-सोशल मीडिया सेल आणि लायब्ररी देखील आहे.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पूर्वेकडील राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. बरीच विकास कामे केली जात आहेत. मोदींनी स्वत: गेल्या काही वर्षात ईशान्येकडील राज्यांचा कमीत कमी ३० वेळा दौरा केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये फार कमी काळात भाजपने प्रगती केली आहे. १९८५ मध्ये भाजपचा एक आमदार होता. आता अरुणाचलमध्ये भाजपने ४८ आमदारांसह सरकार स्थापन केले आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे, याचा आम्हाला आनंद आहे,' अशी भावना नड्डा यांनी व्यक्त केली.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT