2000 Currency Notes Sakal
देश

Currency Notes : २००० च्या नोटा बंद केल्यावर रिझर्व बँकेने कसली कंबर; २४ तास नोटा छपाई करण्याचे आदेश

२३ मे पासून २००० च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणात २००० च्या नोटा घेऊन बँकांमध्ये पोहोचत आहेत.

वैष्णवी कारंजकर

२००० च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता ५०० रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी येत आहे. २००० च्या नोटांचे चलन बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून नवीन ऑर्डर आली आहे. २००० ची नोट बदलण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छापखान्याला दिवसाचे २४ तास, आठवड्याचे ७ दिवस काम करण्यास सांगितलं आहे. २३ मे पासून २००० च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणात २००० च्या नोटा घेऊन बँकांमध्ये पोहोचत आहेत.

अर्धा दिवसही पूर्ण होत नाही की बँकांमध्ये पाचशेच्या नोटांचा तुटवडा आहे. आता त्याचा पुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रिंटिंग प्रेसला २४ तास नोटा छापण्यास सांगितलं आहे. २००० च्या नोटांचं चलन बंद झाल्यापासून सर्वत्र गोंधळाचं वातावरण आहे. नोटा बदलल्यामुळे बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेनं चारही नोटा छापणाऱ्या छापखान्यांना नोटांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यास सांगितलं आहे.

जेणेकरून लोकांना पुरेशा ५०० च्या नोटा मिळू शकतील. सध्या बाजारात सुमारे २४ हजार कोटी म्हणजेच ३ ट्रिलियन २००० च्या नोटा आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आताही प्रिंटिंग प्रेस आपलं सर्वोत्तम देऊनच काम करत आहेत. पण येत्या काळात २००० च्या नोटा बदलण्यासाठी प्रिंटिंग प्रेसला ४०% ने वेग वाढवावा लागणार आहे. जेणेकरून २००० च्या नोटा बदलण्याचे टार्गेट येत्या ५ महिन्यांत पूर्ण करता येईल.

२०१८ पासून २००० च्या नोटांची छपाई थांबली आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे लक्ष केवळ पाचशेच्या नोटांच्या छपाईवर केंद्रित आहे. २०१६ मध्ये जेव्हा ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्या होत्या. तेव्हाही प्रिंटिंग प्रेस चोवीस तास चालत असे. त्या बदलण्यासाठी २००, ५०० आणि २००० च्या नव्या नोटा चलनात आणल्या. त्या काळीही प्रिंटिंग प्रेस रोख प्रवाह नियोजित करण्यासाठी वेगाने नोटा छापायच्या.

भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना २००० च्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ४ महिन्यांचा वेळ दिला आहे. या काळात लोक त्यांच्या २००० च्या नोटा बदलू शकतात. मात्र, एकावेळी २०,००० म्हणजेच २००० च्या फक्त १० नोटा बदलता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT