2016 Indian banknote Demonetisation sakal
देश

Demonetisation Case : नोटाबंदीच्या निर्णयाबाबत १२ला सुनावणी; सर्वोच्च न्यायालय

२०१६ मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : २०१६ मध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. आज न्यायालयामध्ये याबाबत न्या. एस. ए. नाझीर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर सुनावणी झाली. आताच्या परिस्थितीमध्ये हा मुद्दा खरोखरच जिवंत आहे का? अशी विचारणाही पीठाकडून करण्यात आली. केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की,‘‘ वास्तवात जर विचार केला तर हा मुद्दा आज जिवंत आहे असे दिसत नाही पण तरीदेखील अभ्यास म्हणून याची पडताळणी केली जाऊ शकते.

मेहता यांच्या म्हणण्यावर पीठाने काहीशी नाराजी व्यक्त करतानाच आधीच आमच्यावर कामाचे ओझे असताना केवळ अभ्यासासाठी म्हणून पाच न्यायाधीशांचे पीठ नेमण्याबाबत काहीसा नाराजीची सूर आळवत या प्रकरणाची सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी होईल असे सांगितले. हा विषय आता पुस्तकी बनला आहे का? किंवा त्यावर सुनावणी घेता येऊ शकते का? याबाबत आम्ही निर्णय घेऊ असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या पीठामध्ये न्या. बी.आर.गवई, न्या.ए.एस.बोपन्ना, न्या.व्ही. रामसुब्रह्मण्यम आणि न्या. बी.व्ही. नागारथाना यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT