Drought Affected Karnataka esakal
देश

Karnataka Government : कर्नाटकात 237 पैकी 216 तालुके दुष्काळग्रस्त; बेळगाव, खानापूरसह 21 तालुक्यांचा यादीत समावेश

यादीनुसार आता बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक १५ तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सरकारने (Karnataka Government) तीन आठवड्यांपूर्वीच १९५ तालुके अधिकृतपणे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते.

बंगळूर : पहिल्या यादीत वगळण्यात आलेल्या बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यांचा (Khanapur) अखेर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या आधी राज्यातील १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते.

त्यात आता ११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील २३७ पैकी २१६ तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत. सरकारने (Karnataka Government) तीन आठवड्यांपूर्वीच १९५ तालुके अधिकृतपणे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते.

त्यामुळे वगळण्यात आलेल्या काही दुष्काळग्रस्त तालुक्यातून नाराजी पसरली होती. राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनानी मोर्चे काढून व निवेदने देऊन परिस्थितीचे पुन्हा अवलोकन करण्याची व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा अहवाल घेऊन दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीनुसार आता बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक १५ तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा पहिल्या यादीत तसेच बेळगाव व खानापूर या दोन तालुक्यांचा दुसऱ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने पहिली यादी केंद्राला पाठवून दुष्काळ निवारणासाठी निधीची मागणी करणारे निवेदन केंद्राला सादर केले होते.

त्यानुसार केंद्र सरकारची तीन पथके राज्याच्या निरिक्षण दौऱ्यावर आले होते. तीन दिवस त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सरकारला आपला अहवाल सादर केल्यानंतर केंद्राकडून राज्याला दुष्काळ निवारण निधीची अपेक्षा आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड (NDRF) आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड (एसडीआरएफ) निकषांनुसार दुष्काळ निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुक्यांपैकी बहुसंख्य तालुके उत्तर कर्नाटकात आहेत. ज्यात नवीन यादीसह सर्वाधिक तालुके हे बेळगाव (१५), विजापूर (१२) आणि गुलबर्गा (११) जिल्ह्यातील आहेत. तसेच जुना म्हैसूर प्रदेश आणि मध्य कर्नाटकातील तालुक्यांची संख्या अधिक आहे.

सर्वात कमी असलेल्यांमध्ये उडुपी तीन आणि मंगळूर दोन आणि बिदर तीन तालुके दुष्काळग्रस्त आहेत. जूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जुलैमध्ये जास्त पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये ७३ टक्के पाऊस पडला. पावसाची ही नोंद गेल्या १२५ वर्षांतील सर्वात कमी आहे.

दुसऱ्या यादीतील दुष्काळग्रस्त तालुके

जिल्हा तालुका

  • बेळगाव - बेळगाव, खानापूर

  • कारवार - सिद्दापूर, दांडेली

  • धारवाड - कलघटगी, अळणावर, अण्णीगेरी

  • हावेरी - ब्याडगी, हानगल, शिग्गाव

  • चामराजनगर - चामराजनगर, यळंदूर

  • म्हैसूर - कृष्णराजसागर

  • गदग - मुंदरगी

  • हासन - आलूरू, आरसिकेरे, हासन

  • चिक्कमगळूर - मुद्दीगेरे, तरीकेरे

  • कोडगू - पोन्नमपेठ

  • उडुपी - हेब्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT