Marriage relationship delhi crime news 
देश

लव्ह मॅरेजची शिक्षा! मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली आणि जंगलात...

ओमकार वाबळे

प्रेमविवाह केल्यामुळे एका तरुणाला मोठी शिक्षा भोगावी लागली. दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात तरुणाचे गुप्तांग (Genitales) कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी हत्या आणि अपहरणाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डीसीपी (पश्चिम) प्रशांत गौतम यांनी सांगितलं की, सफदरजंग हॉस्पिटलमधून पीसीआर कॉल आला होता. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं की राजौरी गार्डनमधील व्यक्तीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर सगळ्या गोष्टींचा खुलासा झालाय. (Delhi Crime News)

मुलीने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरोधात लग्न केल्याचा राग आल्यामुळेच ही घटना घडली, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांवर आहे. तरुणाचे अपहरण करून आधी मारहाण करण्यात आली. यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याला सागरपूर परिसरात फेकून फरार काही जण फरार झाले. सध्या तरुणाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दिल्लीतील २२ वर्षांच्या पीडितेचे कुटुंब रघुवीर नगरमध्ये वास्तव्यास आहे. त्याचे सागरपूर येथील एका २० वर्षांच्या तरुणीशी जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्नासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांनीच नकार दर्शवला. यानंतर तरुण आणि तरुणी 21 डिसेंबरला पळून जयपूरला पोहोचले. तिथे दोघांनी मंदिरात लग्न केलं. यानंतर 22 डिसेंबर रोजी दोघेही दिल्लीला परतले आणि राजौरी गार्डन परिसरात राहिले. त्याचवेळी मुलीच्या कुटुंबीयांना दोघांच्याही मुक्कामाची माहिती मिळाली.

आधी बेदम मारहाण आणि नंतर…

तरुण आणि तरुणी राजौरी गार्डनमध्ये राहिल्याची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले. यानंतर तो दोघांनाही सोबत घेऊन सागरपूरला गेले. तरुणीच्या कुटुंबीयांनी आधी तरुणावर हल्ला केला आणि नंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी नेलं. यावेळी धारदार शस्त्राने त्याचं गुप्तांग कापलं, असा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर तरुणाला सागरपूर येथील जंगलात फेकून देण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांना गुरुवारी सफदरजंग हॉस्पिटलमधून पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये राजौरी गार्डनमधील व्यक्तीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून माहिती घेतली. यामध्ये काही महत्वाचे खुलासे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT