देश

Marriage season: पुढच्या 23 दिवसात भारतात होणार 'एवढी' लग्न, प्रत्येक सेकंदाला होणार 21.37 लाख रुपये खर्च

दिवाळीचा सण झाला आहे. यावर्षी फक्त 23 दिवसांचा लग्नाचा सीझन आहे.

Aishwarya Musale

दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरू होतो. लग्नाआधी लोक कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत भरपूर खरेदी करतात. ही खरेदी केवळ वधू-वरांसाठी नाही. या लग्नाला येणारे लोक देखील शॉपिंगही करतात. यामुळेच देशात लग्नाच्या हंगामात लाखो रुपयांचा व्यवसाय होतो. हा आकडा ४.२५ लाख कोटी रुपये आहे. या हंगामात, लोक लग्नाच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला सरासरी 21 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात. नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात 35 लाखांहून अधिक विवाह होणार आहेत.

4.25 लाख कोटींची उलाढाल

लग्नाच्या खर्चाशी संबंधित दागिने, कपडे, शूज आणि डिझायनर कपड्यांशी संबंधित व्यवसाय विक्री नोव्हेंबर ते जानेवारी अखेरीस 8 टक्के ते 11 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी व्यक्त केली आहे. यंदा महागाईचा फटका बसला असला तरी हंगामाच्या पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय अपेक्षित आहे.

23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज) असेल, असा कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा अंदाज आहे. लग्नाच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला 21.37 लाख रुपये खर्च केले जातील. सोने परिधान करणे आणि भेटवस्तू देणे या काळात शुभ मानले जाते.

यांना सर्वाधिक फायदा होईल

देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन आहे. निम्म्याहून अधिक खरेदी त्यातील लग्नासाठी केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भारत हा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. या काळात सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभोवन दास भीमजी झवेरी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT