Bengaluru Engineer Robbed Bank Google File Image
देश

कर्जबाजारीपणामुळे २८ वर्षीय इंजिनिअरचा बँकेवर दरोडा, लुटले ८५ लाख

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : ऑनलाइन ट्रेडिंगमुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने एका २८ वर्षीय अभियंत्याने थेट बँक लुटल्याचा (Bengaluru Engineer Robbed Bank) प्रकार समोर आला आहे. त्याने चाकूच्या धाकावर बँकेतील 85.38 लाख रुपयांची रक्कम चोरल्याचा आरोप आहे. ही घटना बंगळुरूमध्ये घडली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

धीरज संपांगी असं आरोपीचं नाव असून तो एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे. ऑलिम्प ट्रेड या यूएस-आधारित ट्रेडिंग कंपनीमध्ये अयशस्वी गुंतवणूक केल्यानंतर त्याने बँक लुटण्याचा निर्णय घेतला. त्याने सुमारे 34 लाख रुपये गुंतवले होते आणि त्याने आपला पगार, त्याच्या कुटुंबाचे सोने वापरले होते. तसेच मित्रांकडून देखील पैसे उसने घेतले. त्याच्यावर ऑनलाइन टेड्रींगमुळे ३५ लाखांचं कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने चाकूच्या धाकावर बँक लुटण्याचा निर्णय घेतला. एसबीआयचे कर्मचारी बँक बंद करत असताना त्याने एक बँकेच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून बँक उघडायला सांगितलं. जीवाच्या भीतीनं कर्मचाऱ्यांनी देखील त्याचं म्हणणं ऐकलं. त्यानंतर आरोपीने त्यांना बँकेच्या स्ट्राँग रूममध्ये नेले. तेथील 3,76,200 रुपये रोख आणि 1800 ग्रॅम सोने त्याने बॅगेत भरले, अस माडीवाला उपविभागाचे एसीपी सुधीर हेगडे यांनी सांगितले.

अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आणि त्यांनी 18 जानेवारीला संध्याकाळी आरोपीला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच बँक लुटल्याचे समोर आले. त्याला ३० हजार रुपये मासिक पगार मिळतो. पण, मित्रांकडून घेतलेले पैसे द्यायचे होते त्यामुळे बँक लुटीची योजना आखली. त्याने युट्यूबवर बँक चोरीचे काही व्हिजिओ पाहिले. त्यानंतर जवळपासच्या बँकांची पाहणी केली, असं पोलिसांनी सांगितलं.

बँकेतील दरोड्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून धीरचा शोध घेतला. ज्या मित्राकडून पैसे घेतले त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. पण, प्रत्येक वेळी त्याने पोलिसांना चकवा दिला. त्यानंतर एका मित्राची कार घेऊन तो गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक केले असता आरोपी धीरजला शोधण्यात त्यांना यश आले, असंही पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT