देश

भारतातून चोरल्या गेलेल्या २९ कलाकृती ऑस्ट्रेलियाकडून मिळवल्या परत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतामधील अनेक महत्त्वाच्या कलाकृती आणि वस्तू इतिहासामध्ये चोरीला गेल्या आहेत. या साऱ्या वस्तू आता पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड सातत्याने सुरु असते. आता भारताने ऑस्ट्रेलियातून अनेक शतके जुन्या असलेल्या तब्बल २९ कलाकृती परत मिळवल्या आहेत. या कलाकृती कोणे एके काळी भारतातून चोरील्या गेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी व्हर्च्यूअली बैठक घेणार आहेत. त्याआधीच या वस्तू भारताला परत मिळाल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

PM मोदी आणि PM मॉरिसन आज व्हर्च्युअल बैठकीत भेटणार आहेत. या बैठकीमध्ये ते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध उपक्रमांतील प्रगतीचा आढावा घेणार आहेत. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, भारतातून काही शतकांपूर्वी चोरीला गेलेल्या मौल्यवान कलाकृतींना परत मिळवण्याची मोहिम सुरु असून या मोहिमेअंतर्गतच ऑस्ट्रेलियाकडून आपण या वस्तू पुन्हा प्राप्त केल्या आहेत. “ऑस्ट्रेलियाने या कलाकृती विकत घेतल्याचं अधिकाऱ्यांना कळताच ही प्रक्रिया सुरू झाली होती. या चोरी झालेल्या कलाकृती परत आणण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले,” असं एका अधिकाऱ्याने सांगितले. या वस्तू गेल्या आठवड्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला प्राप्त झाल्या होत्या.

परत आलेल्या या कलावस्तूंमध्ये शिव भैरव, इ.स.च्या 9व्या - 10व्या शतकातील राजस्थानातील वाळूचे दगडी शिल्प, बाल-संत संबंदर, तामिळनाडूतील 12व्या शतकातील कांस्य पुतळा आणि 1830-40 मधील शिव आणि पार्वतीचे चित्र, कांगडा, हिमाचल प्रदेश येथील आहे. यातील काही कलाकृती ५३ वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्या होत्या.

1972 पासून अशा एकूण 241 पुरातन वास्तू परत मिळवण्यात आल्या आहेत. यापैकी 228 गेल्या आठ वर्षांमध्ये मिळवण्यात आल्या आहेत. यूके, सिंगापूर, जर्मनी, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून यापैकी १५७ कलाकृतीतून परत आणण्यात आल्या आहेत. आणखी तीन कलाकृती इटली, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधून प्राप्त होणार असल्याचं भारतीय अधिका-यांनी सांगितलंय. त्या येत्या आठवड्यात देशाला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

SCROLL FOR NEXT