Mathura  Team eSakal
देश

मथुरेत कलम १४४ लागू; सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात

पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सुधीर काकडे

आज बाबरी मशीद (Babri Masjid) पाडल्याच्या घटनेला आज 29 वर्ष उलटून गेली आहेत. ६ डिसेंबरला झालेल्या या घटनेच्या पार्श्वभूमिवर देशभरात दक्षता घेण्यात येत असून कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरं जाण्यासाठी अनेक संवेदनशील ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बाबरी विध्वंसाला २९ वर्ष होत असून, आता बाबरीनंततर वर्धापनदिनानिमित्त मथुरेतही (Mathura) कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येसह मथुरेत आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काही हिंदू संघटनांनी मथुरेच्या शाही इदगाहमध्ये पुजा करणार असल्याचे जाहीर केले होते. या घोषणेमुळे संपूर्ण मथुरेला छावणीचं स्वरुप आलं आहे. तसेच नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार कलम 144 लागू करण्यात आले असून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी 'अयोध्या, काशी मंदिराचं काम सूरु आहे, आता मथुरेची वेळ आहे.' अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर परिस्थिती विघडण्याची चिन्ह दिसत होती. त्याच पार्श्वभूमिवर सुरक्षेच्या दृष्टीने मथुरा हे 4 सुपरझोन्स, 4 झोन आणि 8 सेक्टरमध्ये विभागण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 200 हून अधिक निमलष्करी दलाचे जवान सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज अयोध्येप्रमाणे मथुरेतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत जन्मभूमी-देग गेटकडे कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जाणार नाही. प्रशासनाने ७ डिसेंबरपर्यंत वाहतूकीसाठी एसओपी जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT