3 killed in fresh incident of violence in Manipur
नवी दिल्ली- १२ दिवसांच्या शांततेनंतर मणिपूरमध्ये पु्न्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आलीये. नागा बहुल उखरुल जिल्ह्यात तीन लोकांची हत्या करण्यात आली आहे. हा प्रदेश नागा बहुल लोकसंख्येचा आहे. मणिपूरमधील हिंसाचारादरम्यान हा प्रदेश शांत होता, पण आता येथेही हिंसाचार उफाळला आहे.
माहितीनुसार, सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कुकींचा रहिवास असलेल्या थोवाई कुकी गावात तीन लोकांची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही लोक गावाचे रक्षण करणारे गार्ड होते. काही लोक सकाळी गावात शिरले. त्यांनी या लोकांना गोळ्या मारुन ठार केलं.
आज झालेली हत्या ही मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा भाग आहे. काही कट्टरतावादी लोक कुकी गावात सकाळच्या सुमारास शिरले. तीन लोक गावाची सुरक्षा करत टेहळणी करत होते. यावेळी गावात शिरलेल्या लोकांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्यात तिघांचा मृत्यू झालाय. घटनेनंतर लष्कर आणि पोलिस गावात पोहोचले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गाव खूप दुर्गम भागात आहे. त्यामुळे जवळचा सुरक्षा नाका तीन किलोमीटर दूर आहे. त्यामुळे घटनेवेळी कोणताही सुरक्षा रक्षक त्याठिकाणी उपस्थित नव्हता. राज्यात मैतेई आणि कुकी-झोमी वांशिक गटामध्ये हिंसाचार सुरु आहे. या काळात उकरुल जिल्हा शांत होता.
मणिपूरमध्ये ३ मेपासून वांशिक हिंसाचार सुरु आहे. मैतेईची संख्या जास्त असलेल्या बिश्नुपूर, इंम्फाल पश्चिम, इंम्फाल पूर्व आणि काकचिंग भागात आणि कुकी-झोमींची संख्या जास्त असलेल्या चुराचंदपुर आणि कांगपोकपी याठिकाणी हिंसाचाराची तीव्रता जास्त होती.
महिलांची धिंड काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरचा मुद्दा देशाच्या केंद्रस्थानी आला. यावरुन विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे केंद्राला याकडे लक्ष द्यावे लागले. विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणल्याने पंतप्रधान मोदी यांना मणिपूर विषयावर बोलावे लागले. पण, अद्याप मणिपूर हिंसाचारावर तोडगा निघालेला नाही. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.