दहशतवाद्यांनी आसाममधील शिवसागर जिल्ह्यातून ओएनजीसी तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे.  संग्रहित छायाचित्र
देश

ONGC च्या तीन कर्मचाऱ्यांचे अपहरण,नागालँड सीमेवर सापडली गाडी

शोध मोहीम तीव्र करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी - दहशतवाद्यांनी आसाममधील शिवसागर जिल्ह्यातून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.च्या (ओएनजीसी) तीन कर्मचाऱ्यांचे बुधवारी सकाळी अपहरण केले आहे. लकवा फिल्ड येथून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. ओएनजीसीचे दोन ज्युनिअर इंजिनिअर (प्रॉडक्शन) आणि एका ज्यूनिअर टेक्निशियनचा समावेश आहे. या दहशतवाद्यांनी ओएनजीसीच्याच गाडीतून या कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. ही गाडी नागालँड-आसाम सीमेजवळील निमोनगडच्या जंगलात बेवारस स्थितीत आढळून आली आहे.

मोहिनी मोहन गोगोई, रितूल सैकिया आणि अलाकेश सैकिया असे अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ओएनजीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, अज्ञात सशस्त्र लोकांनी 21 एप्रिल रोजी पहाटे दोन ज्युनिअर इंजिनिअर आणि एका ज्युनिअर टेक्निशियनचे अपहरण केले. शिवसागर जिल्ह्यातील लकवा फिल्ड येथून हे अपहरण करण्यात आले आहे.

पोलिसांकडून शोध मोहीम सुरु

शिवसागर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमिताव सिन्हा म्हणाले की, एका सशस्त्र दहशतवादी गटाने लकवा फिल्ड येथून ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण केले आहे. अपहत कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी आम्ही संशयित परिसरात अभियान सुरु केले आहे. हे अपहरण कोणत्या गटाने केले आहे, हे अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी ओएनजीसीने तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, शोध मोहीम तीव्र करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत. पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यातही घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफट नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

Bombay High Court : पती-पत्नीच्या वादातील एका वाक्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आधार मानता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहापासून सुरू होणार लग्नसराई! जाणून घ्या २०२६ मधील तारीख आणि शुभ मुहूर्त

Latest Marathi News Live Update : बुलढाणा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात !

SCROLL FOR NEXT