Madhyapradesh E sakal
देश

काळवीटाला मारून नेत होते... पोलीस येताच चकमक, ३ पोलिसांचा मृत्यू

३ काळविटांची शिकार करुन हे शइकारी परतत असताना त्यांचा पोलिसांशी सामना झाला

सकाळ डिजिटल टीम

काळविटाचे शिकारी आणि पोलिसांच्यात झालेल्या चकमकीत सब इन्स्पेक्टरसह ३ पोलिसांचा मृत्यू झालाय. मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्याचे एसपी राजीवकुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोन या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगल क्षेत्रात शिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अशा तीन पोलिसांवर गोळीबार केला, यात तिघांचाही मृत्यू झालाय. (3 police died in poachers attack)

आरोन जंगलात ४ काळविटांची आणि एका मोराची शिकार करुन शिकारी परतत असताना पोलिसांशी त्यांचा सामना झाला. यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला, ५० राउंड फायर करण्यात आले. मात्र शिकाऱ्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला. यात सब इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, हेड कॉन्स्टेबल संतराम मीना, आणि कॉन्स्टेबल नीरज भार्गव यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. एवढंच नाही तर शिकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीच्या ड्रायव्हवर देखील गोळीबार केलाय.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहानी याविरोधात कडक शिक्षेची मागणी केलीय. दिग्विजय सिंहानी ट्वीट करत घटनेचा निषेध करत शिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केलीय.

या घटनेनंतर शिकारी पोलिसांची रायफल घेऊन फरार झालेत, शिकारी दुचाकीवर आले असल्याची माहिती मिळतेय. काळविट आणि राष्ट्रीय पक्षी मोराच्या शिकारीवर बंदी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची लाईफलाईन ठप्प; वसई-विरार लोकल ११ तास बंद, पश्चिम-मध्य-हार्बर मार्गांवर लाखो प्रवाशांचे हाल

India Squad Change: हार्दिक पांड्यासाठी पर्याय सापडला! भारताच्या वनडे संघात मोठा बदल, त्या मॅचविनरचे कमबॅक

BBA BMS BCA Admission: बीबीए, बीएमएस, बीबीएम, बीसीए व इंटिग्रेटेड एमबीए–एमसीए प्रवेश नोंदणीला सुरुवात; १६ जुलैपर्यंत मुदत

Illegal Sand Seizure: जामगाव गायरानात १२-१५ लाखांचा अवैध वाळू साठा जप्त; महसूल प्रशासनावर टाळाटाळीचे आरोप

SCROLL FOR NEXT