3 suspect arrested from Surat in case of Kamlesh Tiwari Murder case 
देश

#KamleshTiwariMurder 'त्या' तिघांनीच केली कमलेश तिवारींची हत्या

वृत्तसंस्था

सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे.

तिघांच्या चौकशीनंतर या तीन संशयितांनी ते या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले आहे. डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते, याच रागातून त्यांची हत्या केल्याचे या तीन संशयितांनी सांगितले आहे.  

काल सकाळी लखनौमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची त्यांच्याच नाका भागातील कार्यालयात 2 अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. भगव्या कपड्यात आलेल्या दोघांनी आधी त्यांच्याशी चर्चा केली, चहा घेतला. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने वार करून तसेच त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या तिवारींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तिवारींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, असे आदेश दिले होते.

दरम्यान, कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास 100 नंबर डायल करत होता. मात्र, त्याचा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. घटना घडल्यानंतर अर्धा तास उलटून गेल्यावर पोलिस पोहोचले, अशी माहिती तिवारी यांच्या नोकराने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

IND A vs SL A: त्याच्यासाठी चॅलेंज असणारच... वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर फायनल सामन्यापूर्वी तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT