देश

देशातील संसर्गाची लाट ओसरतोय? रेमडेसिव्हिरच्या गोळ्यांना अधिकृत मान्यता

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली -  देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट मंदावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. देशात सध्या प्रती एक लाख लोकसंख्येमागे ३० कोरोनाबाधित आढळत असून जागतिकस्तरावर हे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मंत्रालयाने यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) एका अहवालाचा दाखला दिला आहे. भारतात कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५५.७७ टक्के म्हणजे अमेरिका, रशिया व ब्राझीलसारख्या अनेक देशांपेक्षाही जास्त आहे. दरम्यान, कोरोनावरील आणखी एका औषधाला भारतात मंजुरी मिळाली आहे. ‘हेटेरो’ या औषधनिर्मिती कंपनीने रेमडेसिव्हिर या गोळ्या आपण अधिकृतरीत्या बाजारात आणत असल्याचे आज जाहीर केले. 

भारतात लॉकडाऊन लावल्यानंतरच्या काळात, विशेषतः मागील महिन्यापासून वाढत गेलेला कोरोनाचा संसर्ग आता मंदावण्याची चिन्हे आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार, देशातील ४.२५ लाख एकूण कोरोना रुग्णांपैकी २.३७ लाख लोक बरे झाले आहेत. ‘डब्ल्यूएचओ’च्या या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे की, ‘‘ भारतात लोकसंख्येची घनता प्रचंड असूनही प्रती लाख लोकसंख्येमागील संक्रमित रूग्णसंख्येबाबत भारत जगातील सर्वांत कमी संक्रमण असलेल्या देशांमध्ये सामील झाला आहे. प्रती एक लाख लोकसंख्येमागील कोरोनाग्रस्तांची जागतिक सरासरी भारताच्या किमान तिपटीहून जास्त म्हणजे ११४ बाधित इतकी आहे. रिकव्हरी रेटबाबतही भारताची परिस्थिती झपाट्याने सुधारत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला. भारतात हे प्रमाण ५५.७७ टक्के आहे. जर्मनीत सर्वांत जास्त म्हणजे ९२ टक्के रिकव्हरी रेट आहे. राजधानी दिल्लीत गेले चार दिवस रिकव्हरी रेट १८ टक्के दिसत असून दिल्लीचा एकूण रेट ५५.२५ टक्के आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्क्यांत) 
९२ - जर्मनी 
८० - इराण 
७५ - इटली 
५५ - रशिया व भारत 
४० - अमेरिका 
३९ - पाकिस्तान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT