Narendra Modi Sakal
देश

Narendra Modi : राज्याला मिळणार ३० हजार कोटींचे गिफ्ट; पंतप्रधानांच्या हस्ते आज प्रकल्पांचे होणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता.१२) राज्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे गिफ्ट मिळणार आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता.१२) राज्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे गिफ्ट मिळणार आहे. मुंबईतील ‘न्हावा-शेवा अटल सेतू’चे उद्‍घाटन मोदींच्या हस्ते करण्यात येईल. नाशिक येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही ते हजर राहतील.

पंतप्रधान मोदी यांचे सकाळी सव्वा दहा वाजता सुमारास नाशिक येथे आगमन होणार आहे. तेथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे ते उद्‍घाटन करतील तसेच देशभरातील युवकांशीही संवाद साधतील. मुंबईतील न्हावा- शेवा अटल सेतू या प्रकल्पावर १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सेतूमुळे वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होईल. हा देशातील सर्वांत लांब सागरी पूल आहे.

नाशिकमधील कार्यक्रमानंतर मोदी हे नवी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होणार असून या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्‍घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण पार पडेल. मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या बोगद्याची पायाभरणीही मोदींच्या हस्ते करण्यात येईल. हा बोगदा ९.२ किलोमीटर लांबीचा असून यावर ८ हजार ७०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पेयजलाचा महाप्रकल्प

‘सूर्या’ या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केला जाणार आहे. या प्रकल्पावर १९७५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यामुळे पालघर, ठाणे जिल्ह्यांमधील १४ लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. यावेळी २००० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. उरण-खारकोप या रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा त्यात समावेश आहे.

याशिवाय नवीन उपनगरीय स्थानक दिघा गाव, खार रोड व गोरेगाव रेल्वेस्थानकादरम्यानच्या नवीन सहा रेल्वेमार्गांचेही त्यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येईल. देशातील पहिल्या ‘भारतरत्न’ या विशाल सुविधा केंद्राचे उद्‍घाटनही त्यांच्या हस्ते होईल. यावेळी ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतील.

काळारामाचे दर्शन अन् रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर सज्ज झाले असून काळाराम मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील. कुंभमेळा होत असलेल्या गोदाकाठाची ते पाहणी करतील तसेच शक्य झाल्यास तिथेच त्यांच्या हस्ते महाआरतीही होऊ शकते.

त्यानंतर हॉटेल मिर्ची ते संत जनार्दन स्वामी महाराज चौक या दरम्यान १.१ किलोमीटरच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. तपोवनातील मोदी मैदानावर सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांची भव्य जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP vs Chhawa: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Best Bus: बसच्या संख्येत घट, प्रवाशांची गैरसोय; मुंबईकरांची खाजगी बससाठी मागणी

Video Viral: तरुणाचा उद्दामपणा! इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं, भक्त संतप्त... व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Gatari Amavasya: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

WTC Final पुढील सहा वर्षात तरी भारतात होणार नाहीच! ICC ने तीन फायनलसाठी जाहीर केले ठिकाण

SCROLL FOR NEXT