red-fort 
देश

देशातील स्मारके होणार 6 जुलैपासून खुली; लाल किल्ल्यासह 3400 स्मारकांचा समावेश

पीटीआय

नवी दिल्ली- गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणारी तालमहाल, लाल किल्ल्यासह 3400 स्मारके 6 जुलैपासून पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. कोरोनाशी लढताना लॉकडाउन लागू करावा लागल्याने ही स्मारके तब्बल 110 दिवसांनंतर पुन्हा सुरू होत आहेत. 

देशातील बहुतांश स्मारके ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. त्यामध्ये 820 धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्चपासून देशात लॉकडाउन जाहीर केला. त्याच्या एक दिवस आधीपासूनच ही स्मारके पर्यटकांना बंद करण्यात आली होती. "अनलॉक1'नंतर धार्मिक स्मारके पुन्हा सुरू झाली आहेत. उर्वरित सर्व स्मारकेही पुन्हा खुली होत आहेत. मात्र, ती सुरू करण्याचा किवा न करण्याचा अधिकार संबंधित राज्यांना देण्यात आला आहे. 

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी ट्टिटवरून हा निर्णय जाहीर केला. त्याचवेळी आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासही सांगण्यात आले आहे. 

तिरूपती बालाजी मंदिर खुले 
आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर मागील महिन्यात सुरू करण्यात आले आहे. मंदिरातील स्टाफला पीपीई किट, शारीरिक अंतर, मास्क आणि कमीत कमी प्रवेश या अटींवर त्याला परवानगी देण्यात आली आहे. 

या गोष्टी बंदच राहणार 
शाळा, महाविद्यालये, मेट्रो सेवा, चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल, बार आणि अन्य सभागृहे. रात्रीच्या संचारबंदीत शिथिलता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT