China Team eSakal
देश

गलवान संघर्षात 38 चिनी सैनिकांचा मृत्यू; ऑस्ट्रेलियन रिपोर्टमधून खुलासा

फक्त 4 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं चीनने सांगितलं होतं.

सुधीर काकडे

जून 2020 रोजी पूर्व लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठी चकमक (Galwan Conflicts) झाली होती. या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र चकमकीनंतर चीनने (China) त्यांच्या सैनिकांचे मृत्यू लपवल्याचं आता समोर आलं आहे. याप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी चीनने केवळ 4 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द क्लॅक्सन' मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालं आहे. 'गलवान डीकोडेड' नावाने प्रकाशित झालेला हा अहवाल स्वतंत्र संशोधकांच्या समुहानं तयार केला आहे. या चकमकीदरम्यान चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) अनेक सैनिक गालवान नदीत वाहून गेल्याचं सांगण्यात येतंय. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या अहवालामुळे चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय.

चीनचे ३८ सैनिक नदीत बुडाले...

रिपोर्टमध्ये चिनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या हवाल्यानं म्हटलं आहे की, त्या रात्री किमान 38 चीनी सैनिक नदीत बुडाले. तर चीनने केवळ 4 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं होतं. त्या रात्री नेमकं काय घडलं, चकमक का झाली, असं अहवालात म्हटलं आहे. बीजिंगने याबाबत अनेक तथ्य लपवून ठेवले होते. चीनने ही घटना जगाला सांगितली. चिनी अधिकाऱ्यांनी अनेक ब्लॉग आणि बातम्या काढून टाकल्या, मात्र चीनमधील डिजिटल बातम्या आणि व्हिडिओमधून वेगळी बाजू समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT