Mithun Chakravarti Sakal
देश

Video : महाराष्ट्रापाठोपाठ भाजपचे बंगालमध्ये मिशन लोटस? मिथुन चक्रवर्तींचा दावा

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत मविआ सरकार अल्पमतात आणले होते.

निनाद कुलकर्णी

West Bengal : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत मविआ सरकार अल्पमतात आणले होते. या बंडाची संपूर्ण देशाने दखल घेतली होती. यानंतर अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याच धर्तीवर आता भाजप कोलकातमध्ये राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी टीएमसीचे 38 पैकी 21 आमदार आमच्याशी थेट संपर्कात असल्याचे विधान केले आहे. कोलकाता येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मिथुन यांनी हा दावा केला आहे.

चक्रवर्ती म्हणाले की, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ऐकायची आहे का? या क्षणी, 38 टीएमसी आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत, त्यापैकी 21 आमदार आमच्याशी थेट संपर्कात असल्याचा दावा केला आहे. याबाबत अधिक माहिती विचारली असता ते म्हणाला की, चित्रपटाच्या आधी संगीत आणि नंतर ट्रेलर रिलीज होतो. संगीत नुकतेच रिलीज झाले आहे. आता ट्रेलरची वाट पहा. भाजपला मुस्लीमविरोधी म्हणणे हे केवळ एक षडयंत्र आहे, प्रत्यक्षात तसे काहीही नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर प्रश्न विचारला असता मिथुन म्हणाले की, भाजप दंगली घडवते असा नेहमीच आरोप केला जातो. पण मी स्पष्टपणे सांगतो की हा केवळ कटाचा एक भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT