देश

ताबारेषेवर चीनचे ४० हजार सैनिक; अत्याधुनिक शस्त्रे तैनात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लष्करी आणि राजनैतिक मार्गाने चर्चा करून देखील चिनी लष्कर  पूर्व लडाखमधील ताबा रेषेवरून पूर्णपणे माघार घ्यायला तयार नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. चीनकडून मुख्य आघाडीवर अद्याप चाळीस हजार सैनिक तैनात असल्याचे दिसून आले आहे. पूर्व लडाखमधील मुख्य आघाडी आणि आतील भागात चीनने आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. 

भारताने लष्करी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या चर्चेला चीनने पुन्हा एकदा हरताळ फासला असून एवढी चर्चा करून देखील ड्रॅगनच्या कुरापती सुरूच आहेत. चीन काही केल्या पूर्व लडाखमधून माघार घ्यायला तयार नाही. याच भागात त्यांच्या सैन्याने अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा, जवानांची ने- आण करण्यासाठी लागणारी वाहने आणि दीर्घपल्ल्याची मारक क्षमता असणाऱ्या तोफा आणून ठेवल्या आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील आठवड्यात दोन्ही देशांतील कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती,   त्यानंतर देखील चीनच्या भूमिकेत तसूभर देखील बदल झालेला नाही,  चीनने फिंगर-५ येथून माघार घ्यायला नकार दिला आहे. उष्ण पाण्याचे झरे असणारा भाग तसेच गोग्रा परिसर या भागामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. आपण माघार घेतली तर हा भाग भारताच्या ताब्यात जाईल अशी चिंता चीनला सतावते आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्येही चर्चा झाली होती. प्रारंभी माघारीची तयारी दर्शविणाऱ्या चीनच्या भूमिकेत आता मात्र बदल झाल्याचे दिसून येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हणून माघार नाही
फिंगर एरियामध्ये चीनला टेहळणी करण्यासाठी एक विशेष चौकी उभारायची आहे. या माध्यमातून भारतीय लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा त्यांचा इरादा आहे. रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारे कोणतेही भाग काही केल्या सोडायचे नाही असा चिनी लष्कराचा विचार असल्याने त्यांनी एवढी चर्चा होऊन देखील माघार घेतलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT