ANI
देश

डेल्टा+ चा 11 राज्यात प्रसार; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

नामदेव कुंभार

देशातील कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही पण कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी कोरोनाच्या सर्व उपप्रकारांवर प्रभावी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. सध्या सगळ्यांच्याच चिंतेचे कारण ठरलेला कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हेरियंट बारा देशांमध्ये अस्तित्वात असून देशातील अकरा राज्यांत 48 जणांना याचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत कोरोनाच्या अल्फा, बिटा, गॅमा आणि डेल्टावर कोरोना प्रतिबंधक लशी कितपत उपकारक ठरल्या त्या आधारावरच डेल्टा प्लसवरील त्यांची परिणामकारकता पडताळून पाहण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात सर्वाधिक 20, तमिळनाडूमध्ये 9, मध्य प्रदेशमध्ये 7, केरळमध्ये 3, पंजाब व गुजरातमध्ये प्रत्येकी 2 आणि आंध्र प्रदेश, जम्मू, कर्नाटक, ओडिशा, राजस्थानमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे ‘डेल्टा प्लस’ चे रुग्ण 11 राज्यात आढळले आहेत. भारतासह 12 देशांमध्येही हा उत्परिवर्तीत विषाणू आढळल्याची माहिती भार्गव यांनी दिली. अन्य देशांमध्ये ब्रिटन, पोर्तुगाल, चीन, जपान, रशिया, स्वित्झर्लंड आदींचा समावेश आहे.

भार्गव यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

  • गर्भवती महिलांना लस घेता येणार

  • डेटा हाती आल्यावर लहान मुलांना लस

  • मुलांच्या लसीकरणावरून तज्ज्ञांत एकमत नाही

  • अमेरिकेत मुलांमध्ये लसीकरणानंतर गुंतागुंत

  • दुसऱ्या लाटेत 90 टक्के रुग्ण हे डेल्टाचे

  • डेल्टामुळे देशभर संसर्गाची दुसरी लाट आली

  • 174 जिल्ह्यांत ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’

‘डेल्टा प्लस’ची तीव्रता

कोविड पसरवणाऱ्या विषाणूंत विविध भागात म्युटेशन होत असून हा नव्या रूपातील विषाणू हा अधिक संक्रमणशील असल्यानेरुग्णाच्या शरीरात मोनोक्लोनल अँटीबॉडी रिस्पॉन्सचे प्रमाण कमी होते. तसेच INSACOG (कोविडच्या संदर्भात संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेला प्रयोगशाळांचा संघ) यांनी सूचित केल्यानुसार डेल्टा प्लस हा व्हेरिएंटची संक्रमणशीलता, फुप्फुसाच्या पेशींना मजबुतीने चिकटण्याची क्षमता, मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात संभाव्य घट यामुळे हा चिंतेचा विषय आहे. हा व्हेरियंट महाराष्ट्रात, रत्नागिरी, जळगाव आणि अन्य जिल्ह्यांत सापडल्यामुळे या विषाणूंच्या म्युटेशन्स आणि त्यात होत असलेली उत्क्रांती पाहता येत्या काळात कल्पनेपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT