48 commonly used medicines fail latest quality test  
देश

48 Drugs Fail Latest Quality Test: नियमीत वापरली जाणारी तब्बल ४८ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल; सीडीएससीओने जारी केला अलर्ट

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन वेबसाईटवरुन धक्कादायक माहिती समोर

धनश्री ओतारी

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(Central Drugs Standard Control Organisation) वेबसाईटवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. मधुमेह, रक्तदाब ते मल्टि व्हिटॅमिन्सची 48 औषधं गुणवत्ता मापदंड पार करण्यात अपयशी ठरली आहेत. (48 commonly used medicines fail latest quality test govt body releases list)

हेल्थ रेग्युलेटर कडून भारतामध्ये अनेक सर्रास वापरल्या जाणार्‍या कॅल्शियम , फोलिक अ‍ॅसिड, मल्टिव्हिटॅमिन्स, अ‍ॅन्टिबायोटिक्स आणि अ‍ॅन्टि डायबेटिक तसेच हृद्यविकारांच्या गोळ्यांनी ड्र्ग्स क्वालिटी टेस्ट पास करू शकले नाहीत. दर महिन्याला याबाबत सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून वेबसाईटवर एक यादी जारी केली जाते. त्यामध्ये 48 औषधांचा समावेश करण्यात आला आहे.

मार्च महिन्यात 1497 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत त्यापैकी 48 मेडिसीन बॅचेसनी गुणवत्ता मापदंड पार केलेले नाहीत.

सरकराने जारी केलेल्या यादीत औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा सौंदर्यप्रसाधने समाविष्ट आहेत जी एकतर मानक दर्जाची नाहीत किंवा बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँडेड आहेत. त्यामुळे फ्लॅग्ड प्रोडक्ट्सही मानक दर्जाची किंवा NSQ नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

एपिलेप्सी ड्रग, हायपरटेन्शन ड्रग, अँटी-डायबिटीज ड्रग कॉम्बिनेशन आणि एचआयव्ही ड्रग यासारखी सर्वाधिक विकली जाणारी औषधे ड्रग अलर्टचा भाग आहेत. यामध्ये लोकप्रिय हायपरटेन्शन औषध टेलमा देखील समाविष्ट आहे - ज्यामध्ये तेलमिसार्टन आणि अमलोडिपिन यांचा समावेश आहे.

इतर सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधांमध्ये लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, प्रोबायोटिक्स आणि अनेक मल्टीविटामिन गोळ्या यांचा समावेश होतो. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, फॉलिक अ‍ॅसिड आणि नियासीनामाइड इंजेक्शन्सचाही समावेश आहे.

उद्योग तज्ज्ञांच्या मते, यादीत औषधाची नावं आल्यावर - बॅच नंबर, उत्पादनाची तारीख आणि कालबाह्यता तारीख - कंपनी संपूर्ण बॅच परत मागवते. “पुन्हा मागवल्यानंतर, संपूर्ण बॅच नष्ट करावी लागेल,” असे उद्योगातील अनुभवी व्यक्तीने सांगितले.

वारंवार गुणवत्ता तपासणीत अपयशी ठरणाऱ्या उत्पादन युनिट्स शोधण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी सरकारद्वारे अलर्टचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT