narendra modi  file photo
देश

14 ऑगस्ट 'फाळणी भयावह स्मृती दिवस' म्हणून साजरा होणार; मोदींची घोषणा

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत 14 ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मरण दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. (National Latest News)

#PartitionHorrorsRemembranceDay हा दिवस आपल्याला भेदभाव, द्वेष आणि वैर या विषाला नष्ट करण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवी संवेदना मजबूत करण्यासाठी मदत करेल. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली. देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस उद्या साजरा केला जाणार आहे.

फाळणीच्या जखमा आजही ताज्या आहेत. लाखो लोकांना यावेळी स्थलांतर करावे लागले होते. माहितीनुसार, जगातील हे सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक होते. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद होता. पण, त्याचवेळी भारत-पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. पाकिस्तानातून भारतात आणि भारतातून पाकिस्तानात असे मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर केले. याकाळात हिंसाचाराच्या घटना घडल्या. दोन्ही बाजूंनी हिंसा झाली. यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस फाळणी भयावह स्मरण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravikant Tupkar : "वीज अंगावर पडून बैलाचा मृत्यू अन् हतबल शेतकऱ्यानं पत्नीलाच जुंपलं अवताला! लातूरमधील 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्राची मान शरमेने खाली"

Tarapur News : डहाणू लव्ह जिहाद अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; न्यायालयीन प्रक्रिया सुरू

BAN vs AUS 1st ODI: बांगलादेशच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉश इंग्लिससोबत 'राडा' घातला; मॅच जिंकून मालिकेत घेतली आघाडी

Collagen for Skin & Joint Health: कोलेजन खरोखरच त्वचा सुधारण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते का?

Meenakshi Natarajan Nomination Rejected : काँग्रेसला मोठा धक्का! राज्यसभेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द; भाजपच्या तक्रारीनंतर ऐनवेळी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT