Manish Sisodia esakal
देश

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना ५ दिवसांची CBI कोठडी!

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सिटी कोर्टात हजर केले होते. सीबीआयने मनीष सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी न्यायालयात मागितली होती. दरम्यान न्यायालयाने सिसोदिया यांना पाच दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. 

मनीष सिसोदिया यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यादरम्यान सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा युक्तिवाद सीबीआयने केला. 

दरम्यान मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी अटक केली होती.

दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली 'लीक' करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Ministers: चीनमधील शी जिनपिंग सरकार हादरलं! दोन बड्या नेत्यांना फाशीची शिक्षा; न्यायालयाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

Eknath Shinde: वादळामुळे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले; जुहू विमानतळावर थरारक लँडिंग, पाहा व्हिडिओ

वैभव सूर्यवंशी २१ व्या वर्षी निवृत्त होईल! सहा वर्षानंतर त्याची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येईल? कोणी केलीय ही भविष्यवाणी?

Ratnagiri Beach Assault : आरे-वारे बीचवर हुल्लडबाजी! मुंबईच्या पर्यटकांना दमदाटी मारहाण, चौघांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अवकाळी पाऊस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं

SCROLL FOR NEXT