5 labourers dead 11 injured after truck overturns in Madhya Pradeshs Narsinghpur 
देश

भीषण : ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू

वृत्तसंस्था

जबलपूर : लॉकडाऊनमुळे ट्रकमधून लपून घरी परतणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशात नरसिंहपूर येथे पाठा गावाजवळ झाली आहे. नरसिंहपूर इथे पाठा गावाजवळ आंब्याचा ट्रक उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये ५ जणांच्या मृत्यूसह  ११ जण जखमी झाले आहेत. या ट्रकमध्ये आंब्यांसोबत ड्रायवरसह 18 लोक लपून आपल्या घरी जात होत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

आंब्याच्या ट्रकमध्ये बसून सर्व मजूर आग्राला जात होते. त्याचवेळी ट्रक उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये 15 मजूर ट्रकखाली दबले गेले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहाणी केली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना जबलपूर इथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या मजुराला फ्रॅक्चर आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींपैकी एकाला तीन दिवस सर्दी, खोकला आणि ताप आहे. कोरोनाचा संशय असल्यानं सर्व मजुरांची कोविड-19 ची चाचणी केली जाणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. ४६ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हातात पैसा आणि काम दोन्ही नसल्यानं मजुरांनी आपल्या गावी परतण्याचा मार्ग निवडला आहे. मिळेल त्या साधनाचा वापर करून आपल्या घरी परतण्यासाठी मजुरांची धडपड सुरू आहे. अशाच परिस्थितीत मध्यप्रदेशात हा अपघात झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निवडता येतील 300 महाविद्यालये! प्रवेशासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे, जूनमध्येच प्रवेश नोंदणी, 4 प्रवेश फेऱ्या

Panchang 8 June 2026 : आजचे पंचांग! कालाष्टमी, मृग नक्षत्र प्रवेश आणि शुभ योग

साधे पोहे विसरा! वजन कमी करणाऱ्यांचा नवा फेव्हरेट ठरतोय हा 'फायबरयुक्त चिला'; जाणून घ्या सोपी रेसिपी

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

SCROLL FOR NEXT