देश

झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; पाच पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था

जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांना लुटून त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेतली. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला पश्चिम बंगाल-झारखंड सीमेवर झाला. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही सध्या घटनास्थळी पोहोचलो आहोत. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. 

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबार दास यांनी या घटनेचा निषेध केला असून, ते म्हणाले, पोलिसांनी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही. तसेच या सर्व नक्षलवाद्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येतील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महायुद्ध सुरू ? इराण -अमेरिका संघर्षात दोन देशांची उडी... बहरीन अन् कुवेतचा इराणवर थेट हल्ला! जगावर मोठं संकट

Konkan Cyclone: तळकोकणात चक्रीवादळाचा तडाखा, बांद्यात बागायतीला फटका; लाखोंचं नुकसान

Live Updates Marathi : साथीच्या आजारांचा धोका वाढला, पुण्यात डेंग्यूचे ३ हजार ७६२ तर हिवतापाचे २ हजार ३६ रुग्ण

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

SCROLL FOR NEXT