Jammu-Kashmir Team eSakal
देश

जम्मू काश्मीर: सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; CRPF च्या 5 तुकड्या रवाना

जम्मू काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांत दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

सुधीर काकडे

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) सातत्याने वाढणाऱ्या 'टार्गेट किलिंग'च्या घटनांबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) आणखी पाच तुकड्यांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले आहे. लष्कराच्या या तुकड्या लवकरच जम्मू-काश्मीरच्या वेगवेळ्या भागांत तैनात होणार आहेत. सोमवारी जुन्या श्रीनगरच्या बोहरी कडाल भागात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडितांच्या दुकानातील कामगाराची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर या भागात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बटमालू भागात एका पोलिसाची हत्या केली होती.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत बिगर मुस्लीमांवर झालेल्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी आता कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच अतिरिक्त कंपन्या येथे पाठवण्यात येणार आहेत. केंद्रशासित प्रदेश असलेल्या प्रदेशात यावर्षी आतापर्यंत एकूण 112 दहशतवादी मारले गेले असून 135 जणांना पकडण्यात आल्याची माहिती सीआरपीएफने दिली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या जम्मू आणि काश्मीर युनिटचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी केंद्रशासित प्रदेशातील हत्यांच्या घटनांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला आहे. खोऱ्यात दहशतवाद्यांकडून होणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या हत्येमागे पाकिस्तानी कारस्थान असून, त्यांना इथली शांतता भंग करायची असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Who is Sanjita Mohapatra? : सत्यम गांधींची तडकाफडकी बदली! आता 'या' डॅशिंग महिला अधिकारी सांभाळणार सांगली महापालिकेचा कारभार

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

SCROLL FOR NEXT