stray dogs esakal
देश

Stray Dogs attack : भटक्या कुत्र्यांनी पाच वर्षांच्या मुलीचे लचके तोडले; चिमुरडीचा...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - देशातील अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत इतकी वाढली की लोकांना घराबाहेर पडण्यास त्रास होत आहे. अनेक वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावून जखमी केले आहे. आता छत्तीसगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. बैकुंठपूर येथील गाईडन्स स्कूल रोडजवळ ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलगी शौचास जात असताना तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.

बैकुंठपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्टेशन हाऊस ऑफिसर अश्विनी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT